मुंबई : करोनाच्या विळख्यात सापडला असताना व ऑक्सीजनचा तुटवडा भासत असताना दिलासा देणारी बातमी असून विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘’ आज कळंबोली गुडस यार्डमधून रवाना करण्यात आली. रेल्वे वाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सीजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री यांनी केंद्र शासनाकडे केली होती. त्याला रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करुन आज पहिली रेल्वे रवाना केली. परिवहनमंत्री ॲड. यांनी या एक्स्प्रेसला हिरवा दिवा दाखवून रवाना केले. ( Maharashtra )

वाचा:

ऑक्सीजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या पाच दिवसांत ११० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सीजनचा पुरवठा राज्याला होणार आहे. ऑक्सीजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वेमार्गे ऑक्सीजन वाहतूक करता येईल, असे केंद्र शासनाला सूचवले होते. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली असून यापुढील काळात ऑक्सीजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सीजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.

वाचा:

राज्याचा परिवहन विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग गेल्या आठ दिवसांपासून केंद्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे यासंदर्भात पाठपुरावा करत होते. ऑक्सीजन वाहतूक करणाऱ्या टँकरचे आकारमान, उंची याअनुषंगाने विद्युतीकरण झालेल्या रेल्वेमार्गावरून वाहतूक करण्याबाबत काही अडचणी, आव्हाने होती. तथापि, योग्य आकारमानाच्या टँकरचा शोध घेऊन कळंबोली येथील प्लॅटफॉर्म काही अंशी अपूर्ण असल्याने बोईसर येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन रेल्वेच्या सपाट वॅगनवर रिकामे टँकर लोड करून यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली.

वाचा:

कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सीजन एक्स्प्रेस चालविणे अधिक व्यवहार्य असल्याने दोन दिवसांत येथील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले; आणि आज प्रत्यक्ष रिकामे टँकर सपाट वॅगनवर ‘रोल ऑन-रोल ऑफ’ पद्धतीने चढवून सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास ऑक्सीजन एक्स्प्रेसला रवानाही करण्यात आले. हे प्रत्येकी १६ मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सीजन वाहतुकीची क्षमता असलेले विशेष टँकर आहेत. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, ताईयो निप्पॉन सॅन्सो इंडिया, एअर लिक्विड, लिंडे आदी कंपन्यांचे हे टँकर आहेत. नेहमीच्या पुणे-सिकंदराबाद-विजयवाडा रेल्वेमार्गावर बोगदे असल्यामुळे ओव्हरहेड वायरची उंची तुलनेत कमी होत असल्याने या मार्गावरून ऑक्सीजनचे टँकर वाहून नेणे शक्य नव्हते. त्यामुळे तुलनेत लांबचा असला तरी व्यवहार्य असा सूरत-नंदूरबार-जळगाव-नागपूर असा लोहमार्ग निवडण्यात आला आहे.

वाचा:

या एक्स्प्रेसला सिग्नल्सचा कमीत कमी अडथळा येईल, अशा पद्धतीने ‘ग्रीन कॉरिडॉर’ही तयार करण्यात आला असून केवळ दीड दिवसात एक्स्प्रेस विशाखापट्टणम येथे पोहचेल. तेथील ‘राष्ट्रीय इस्पात लि.’ या कंपनीतून दीड-दोन दिवसात द्रवरुप प्राणवायू भरुन टँकर लगेच परत महाराष्ट्राकडे रवाना होतील. अशा पद्धतीने येत्या पाच दिवसांच्या आत सुमारे ११० मेट्रिक टन ऑक्सीजन राज्याला रेल्वेवाहतुकीद्वारे प्राप्त होईल. उच्च वजनक्षमतेमुळे ऑक्सीजन टँकरची वाहतूक रस्तामार्गे करणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नव्हते तसेच त्यासाठी प्रदीर्घ वेळ लागला असता, अशी माहिती परिवहन आयुक्त यांनी दिली.

दरम्यान, ऑक्सिजन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यासाठीचा कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता निश्चित करण्यात आल्याचे परिवहन मंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र मंत्री अनिल परब यांची महत्त्वाची खासगी बैठक लांबल्याने ते उशिराने कळंबोली यार्डात दाखल झाले. यामुळे पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस काहीशा विलंबाने रवाना झाली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here