वाचा:
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण सुरू असून सध्या ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लस दिली जात आहे. अनेक जण लस घेतल्याचे फोटो सोशल मीडियात शेअर करत आहेत. तन्मय फडणवीस याचाही असाच एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेसनं तन्मय फडणवीसचा लसीकरणाचा फोटो शेअर करून व भाजपला घेरलं आहे.
‘४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का,’ असा सवाल काँग्रेसनं ट्वीटच्या माध्यमातून विचारला आहे.
भाजपकडं लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?
काँग्रेसनं या निमित्तानं काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का?, तो फ्रंटलाइन वर्कर आहे का?, तो आरोग्य कर्मचारी आहे का? आणि जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी गेली?,’ अशी सरबत्तीच काँग्रेसनं केली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनप्रमाणे भाजपकडं लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?,’ असा खोचक टोलाही काँग्रेसनं हाणला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times