वाचा:
महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते () यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांना स्वतःचा प्रभाव वापरायचा असता तर त्यांनी आपली पत्नी व मुलीला करोनाची लस दिली असती. अजूनही त्यांनी तसं केलेलं नाही. उगाच कोण्या लांबच्या नातेवाईकाचं लसीकरण त्यांना चिटकवायचा प्रयत्न करू नका,’ असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. ‘शिवसेनेच्या आमदार व महापौरांनी पात्र नसताना लस घेतली होती, त्याचे आधी बोला,’ असंही उपाध्ये यांनी सुनावलं आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण सुरू असून सध्या ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लस दिली जात आहे. अनेक जण लस घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तन्मय फडणवीस याचाही असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून काँग्रेसनं देवेंद्र फडणवीसांना प्रश्नांची सरबत्ती केली होती. तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का?, तो फ्रंटलाइन वर्कर आहे का?, तो आरोग्य कर्मचारी आहे का? आणि जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी गेली?,’ अशी विचारणा काँग्रेसनं केली होती. सोशल मीडियावरही भाजपवर प्रचंड टीका झाली होती. त्यानंतर अखेर भाजपनं मौन सोडलं आहे.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times