देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आर्थिक राजधानी मुंबईतही करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं मुंबईतही कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. करोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत मुंबईतील उच्चभ्रु वस्ती करोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. तर, चाळ व झोपडपट्टीत त्या तुलनेत रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचं चित्र आहे.

मुंबईतील झोपडपट्ट्या, चाळीत १०% करोना रुग्ण; उच्चभ्रू वस्तीत टेन्शन कायम

मुंबईतील झोपडपट्ट्या, चाळीत १०% करोना रुग्ण; उच्चभ्रू वस्तीत टेन्शन कायम
मुंबईतील झोपडपट्ट्या, चाळीत १०% करोना रुग्ण; उच्चभ्रू वस्तीत टेन्शन कायम

देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आर्थिक राजधानी मुंबईतही करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं मुंबईतही कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. करोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत मुंबईतील उच्चभ्रु वस्ती करोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. तर, चाळ व झोपडपट्टीत त्या तुलनेत रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचं चित्र आहे.

१० टक्के अॅक्टिव्ह झोपटपट्टीत
१० टक्के अॅक्टिव्ह झोपटपट्टीत

करोनानं मुंबईत पुन्हा थैमान मांडले असताना इमारती, उंच इमारती, टॉवरमधील रहिवाशांना त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. शहरातील झोपडपट्ट्या, चाळींमध्ये करोनाचा संसर्ग अतिशय मर्यादित स्वरुपात राहिला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या ८७ हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील जवळपास ९० टक्के रुग्ण हे मुंबईतील सोसायटी, मोठ्या कॉलनी आणि अन्य परिसरातील आहेत. तर, १० टक्के अॅक्टिव्ह रुग्ण हे चाळी व झोपटपट्ट्यांमध्ये आहेत.

उच्चभ्रू वस्तीत रुग्ण वाढले
उच्चभ्रू वस्तीत रुग्ण वाढले

एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील जवळपास ७९ हजार ०३२ रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीतील आहेत. तर, फक्त ८ हजार ४११ रुग्ण हे मुंबईतील वेगवेगळ्या वस्ती व चाळीतील आहेत. गेल्यावर्षी याच वस्ती व झोपटपट्टीतील रुग्णसंख्येनं प्रशासनाची चिंता वाढवली होती. त्यातीलच एक म्हणजे धारावी. मात्र, आता धारावीतही करोना संसर्ग मर्यादित स्वरुपात आहे. जुलै २०२०मध्ये ५७ टक्के रुग्ण हे वस्त्यांमध्ये होते तर, फक्त १६ टक्के रुग्ण सोसायटी व उच्चभ्रू वस्त्यांमध्ये होते. मात्र, आता हे चित्र पूर्णपणे पालटले आहे.

मुंबईत १० हजार मजले सील
मुंबईत १० हजार मजले सील

बीएमसीच्या आकडेवारीनुसार, मुंबईत आता ११६९ इमारती सील करण्यात आल्या असून जवळपास इमारतीतील १० हजार मजले पालिकेनं सील केले आहेत. या परिसरात जवळपास २० लाख लोकं राहतात. म्हणजेच मुंबईत जवळपास इतके लोक कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. पालिकेच्या नियमांनुसार एका इमारतीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास तातडीने इमारती, विंग सील करण्यात येत आहे.

वरळीचा भाग यशस्वी ठरला
वरळीचा भाग यशस्वी ठरला

मुंबईत गेल्यावर्षी करोनाने प्रवेश केला आणि सुरूवातीच्या टप्प्यात वरळीतील कोळीवाडा परिसर जनता कॉलनी, आदर्शनगर, जिजामातानगर हॉटस्पॉट झाले होते. तेव्हा या संपूर्ण परिसरात करोनाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. हा सारा भाग संपूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. तिथे अनेक दिवस पोलिस पहाराही बसविण्यात आला होता. आता एका वर्षानंतर करोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असताना वरळीतील दृश्य निराळे ठरले आहे. पालिकेच्या जी-दक्षिणचा विभाग तेव्हा अतिशय तणावाखाली होता. पण आता तिथली परिस्थिती बदलली असून करोना संक्रमणाची लाट अडविण्यात वरळीचा भाग यशस्वी ठरला आहे.

मुंबईत येणाऱ्यांची चाचणी होणार
मुंबईत येणाऱ्यांची चाचणी होणार

दरम्यान, मुंबईत गेल्या दोन महिन्यांपासून करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः रेल्वेमार्गाने हजारो नागरिक दररोज मुंबईत येतात. येणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात येणार आहे. कुंभ मेळ्यात सहभागी भाविक परतल्यावर त्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी मोठ्या प्रमाणात करण्याचे पालिकेने ठरवले आहे. देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वाधिक प्रवासी हे रेल्वेमार्गाने येत असल्याने मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात येणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here