यानं लस घेतल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या केवळ ४५ वर्षे वयावरील व्यक्तींना, फ्रंटलाइन वर्करना व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. तन्मयला यापैकी कोणत्या निकषावर लस दिली गेली, असा प्रश्न विचारला जात आहे. हा सगळा वाद सुरु असताना यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.
शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी तन्मय फडणवीसच्या लसीकरणावरुन याला म्हणतात विशेषाधिकार, असा टोला लगावला होता. चतुर्वेदी यांच्या ट्वीटला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. नियम आणि कायद्याच्यावर कोणीही नाही. कायदा आपले काम करु शकतो आणि आम्ही न्यायासाठी नेहमीच उभे आहोत. या प्रकरणी आम्ही तुमच्यासोबत आहोत. जे लोकं नियमांविरुद्ध रांगेत उभे आहेत त्यांच्यावर कारवाई करा, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषांच्याआधारे लसीचा डोस देण्यात आला याची कल्पना नाही. जे हे नियमांनुसार झालं असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. परंतु, नियामांचं उल्लंघन करुन जर हे झालं असेल तर ते आयोग्य आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times