अमरावती: गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी भरधाव वाहनाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस वाहनाला धडक देत ते वाहन पुढे निघून गेले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग केला. पोलिसांनी वाहन जप्त केले. या वाहनातून गुरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. वाहनातून ११ गुरांची सुटका करण्यात आली.

जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. असे असतानाही घरफोड्या, वाहनचोरी आणि गुरांची अवैध वाहतूक थांबलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या हद्दीतील लालखडी परिसरात गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या चालकाने वाहन न थांबवता पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात आठ गायी आणि तीन बैल होते. त्यांची किंमत अंदाजे ९६ हजार रूपये आहे. त्यांची सुटका केली. मात्र, वाहनचालक आणि त्याचा साथीदार दोघेही पोलिसांच्या हातून निसटले. ही घटना सोमवारी (ता. १९) घडली.

पोलीस आयुक्तांचे विशेष पथक लालखडी परिसरात गस्त घालत असताना, एका वाहनातून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यामुळे संशयावरून त्या वाहनास थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. चालकाने पोलिसांच्या वाहनाला धडक मारून धूम ठोकली. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला. त्यानंतर अलीम नगरमध्ये वाहन अडवले. पोलिसांच्या हातून चालक आणि त्याचा साथीदार निसटला. पोलिसांनी वाहनातून गुरांची सुटका केली. पुढील तपास नागपुरी गेट पोलीस करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here