नवी दिल्लीः देशात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण पडत आहे. पंतप्रधान मोदी स्वतः उच्च स्तरीय बैठका घेत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित ( ) करत आहे. वाचा अपडेट्…

– आपले साहस, धैर्य आणि शिस्तीमुळे परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही. सर्वांचं आरोग्य आणि कुटुंबांचं आरोग्य चांगलं राहील, यासाठी प्रार्थना करतो

– चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. उद्या श्रीराम नवमी आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांनी मर्यांदाची शिकवण दिली. यामुळे आपण मर्यादांचे पालन करावं. तर रमजानही सुरू आहे. रमजानच्या महिन्याचा आज ७ वा दिवस. रमजान आपल्यालया धैर्य आणि शिस्तीची शिकवण देतं. यामुळे करोना नियमांचं पूर्ण पालन करावं

– करोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा. तरुणांनी छोट्या-छोट्या गटांच्या माध्यमातून समाजात करोना नियमांचे पालन करण्यास मतद करावी. औषधासोबत कडक नियमांचे पालन हा मंत्र विसरून चालणार नाही. लस घेतल्यावरही हा मंत्र आवश्यक

– करोनाचे नियम पाळून जनतेने देशाला लॉकडाउन करण्यापासून वाचवावं. राज्यांनीही लॉकडाउनचा पर्याय हा शेवटचा ठेवावा. छोट्या-छोट्या कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रीत करावं

– प्रसार माध्यमांनी नागरिकांना अफवांपासून जागरूत करावं

– गेल्या वेळेपेक्षा यावेळची स्थिती खूप वेगळी आहे. तेव्हा आपल्याकडे पुरेशा पायाभूत सुविधा नव्हत्या. करोना टेस्टसाठी लॅब नव्हत्या. पीपीई किट नव्हते. पण आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पीपी किट्स, लॅब्स आणि क्षमता आहे

– देशाने करोना विरोधात आतापर्यंत मोठ्या धैर्याने लढाई लढली आहे. याचं श्रेय जनतेला आहे. आता पुन्हा जनतेच्या सहभागाने आपण करोनावर मात करू

– करोनाच्या प्रादुर्भाव रोखून अर्थचक्र आणि उद्योग सुरू राहण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे

– स्थलांतरी मजुरांना गावी जाण्यापासून राज्यांनी रोखावं. त्यांनी जिथे आहे तिथेच थांबावं. राज्यांनी त्यांना विश्वास द्यावा. मजूर आणि कामगारांचं लवकरात लवकर लसीकरण करण्याची जबाबदारी घ्यावी.

– आता १८ वर्षांवरील नागरिकाना १ मे पासून लस दिली जाणार आहे. सरकारी केंद्रांवर लस मोफत दिली जाणार आहे. १२ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. गरीब आणि मध्यम वर्गातील कुटुंबांना याचा लाभ होईल. देशात लसीचे जे उत्पादन होईल त्यातील निम्मा वाटा हा राज्यांना आणि हॉस्पिटल्सना दिला जाईल

– भारताने करोनाच्या पहिल्या लाटेतच लस तयार केली. आपल्या शास्त्रज्ञांनी मोठ्या मेहनतीने लस विकसित केली. आता त्याचा फायदा आपल्याला होतोय. दोन मेड इन इंडिया लसींचा आपल्याला मोठा उपयोग होतोय. आज जगातील सर्वात स्वस्त लस भारताकडे आहे

– देशात मोठे फार्मा क्षेत्र आहे. हे क्षेत्र वेगाने आणि चांगल्या औषधांचं उपत्पादन करत आहे. औषधांचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्व कंपन्यांना सहकार्य केलं जात आहे. औषधांचं उत्पादन वाढवलं जात आहे

– प्रत्येक गरजवंताला ऑक्सिजन मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा होऊ देणार नाही

– करोना रुग्ण वाढल्याने ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राद्वारे प्रयत्न केला जात आहे. रेल्वेचाही उपयोग केला जात आहे

– कठीण परिस्थिती धैर्य न गमवता त्याचा सामना देश करत आहे. देश मोठ्या संकटातून जात आहे. करोना योद्ध्यांना सॅल्यूट.

– करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत डॉक्टर्स आणि नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठे काम केले

– करोनाने मृत्यू झालेल्या सर्वांना पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली

– देशात करोनाची दुसरी लाट तुफान बनून आली. ज्यांनी आपल्या नातलगांना गमावलं आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहेः पंतप्रधान मोदी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here