मुंबई: राज्यात नव्या बाधित रुग्णांची वाढ वेगवान गतीनेच होत असून गेल्या २४ तासांत राज्यात ६२ हजार ०९७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ५८ हजार ९२४ इतकी होती. कालच्या तुलनेत आज काहीशी वाढ झाली असून हा फरक ३ हजार १७३ इतका आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५४ हजार २२४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ५२ हजार ४१२ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ८३ हजार ८५६ वर जाऊन पोहचली आहे. (maharashtra registered 62097 new cases in a day with 54224 patients recovered and 519 deaths today)

आज राज्यात एकूण ५१९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ३५१ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ५४ हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३२ लाख १३ हजार ४६४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१४ टक्क्यांवर आले आहे.

राज्यात ६,८३,८५६ सक्रिय रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ८३ हजार ८५६ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १७ हजार ५२१ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ८२ हजार ६७१ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ८० हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७८ हजार ४८४ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४४ हजार २७९ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये २१ हजार ६३४ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १४ हजार ७७९, नांदेडमध्ये ही संख्या १३ हजार २३३ इतकी आहे. जळगावमध्ये १३ हजार ४२५, तसेच तर रायगडमध्ये एकूण १३ हजार २७९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ५ हजार ८९३, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ०५७ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ०७४ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

३८,७६,९९८ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४३ लाख ४१ हजार ७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३९ लाख ६० हजार ३५९ (१६.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ लाख ७६ हजार ९९८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २७ हजार ६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here