राज्य शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदावर करण्यात करण्यात आली असल्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. नवीन पदाचा कार्यभार अभिमन्यू काळे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा अशी सूचनाही यांना करण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनवरून सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असे युद्ध रंगल्याचे चित्र आहे. दरम्यानच्या काळात ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला विलेपार्ले पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी धाव घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकारण तापले होते. त्यातच एफडीए आयु्क्त काळे यांनी दिलेल्या पत्रामुळे देखील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नाराज होते. काळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यानंतर काळे यांची बदली करण्यात आली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times