सोलापूर-तुळजापूर महामार्गावर तामलवाडीजवळील पुलावर सिलिंडर स्फोटामुळं ट्रक जळून खाक झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाला पाचारण करण्याआधीच ट्रक जळून खाक झाला होता. काही वेळानं आणि उस्मानाबाद, तसेच तुळजापूर येथून अग्निशमन बंब आले. कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. ट्रक आणि सिलिंडर बाजूला काढण्याचे काम सुरू होते.
घरांना हादरे, भांडी पडली
स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, घटनास्थळापासून जवळ असलेल्या घरांना हादरे बसले आणि घरातील भांडी पडली. स्फोटाच्या आवाजाने गावकर्यांनी घटनास्थळीधाव घेतली. गावकर्यांनी स्थानिक पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. तातडीने पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद केली. तर ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून गावकऱ्यांना आवाहन करत, घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या. एकापाठोपाठ गॅस सिलिंडरचे स्फोट होत होते. आजूबाजूला त्याची दाहकता जाणवत होती. दरम्यान या दुर्घटनेमुळं वाहतूक बंद केल्यानं महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times