नवी दिल्लीः ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ‘स्विगी’ (Swiggy)ने ‘सेफर इंटरनेट डे’ () 2020 च्या निमित्ताने आपल्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिलाय. कस्टमर केअर एग्झीक्युटिव्ह असल्याचे सांगत ग्राहकांची संवेदनशील माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातोय. गेल्या काही महिन्यांमध्ये या घटना घडल्याचे समोर आले आहे. कृपया सावधा राहा, हा कस्टमर केअर नंबर बनावटही असू शकतो, असं पत्रक काढत स्विगी ग्राहकांना सावध केलं आहे. ‘सेफर इंटरनेट डे’च्या निमित्ताने स्विगीने ग्राहकांना सावध केलंय. तसंच फसवले गेल्यास ग्राहकांनी काय करावं? हेही स्विगीने सांगितलंय.

स्विगीने ग्राहकांना केले अॅलर्ट

स्विगीने पत्रक प्रसिद्ध केलंय. स्विगी ग्राहकांची फायनॅन्शिअल माहिती कधी मागत नाही. असा फोन आल्यास आपला डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर, CVV नंबर, OTP, UPI/ATM पिन देऊ नका. कशा प्रकारे स्विगीच्या नावाने फसवणूक होऊ शकते, याच्या वेगवगेळ्या प्रकारांचीही माहिती स्विगीने दिलीय.

अशा प्रकारे होतो फसवण्याचा प्रयत्न

१. स्विगीच्या नावाने बोगस टोल फ्री नंबर
२. बनावट वेबसाइट, ब्लॉग आणि सोशल मीडिया पोस्ट
३. व्हॉट्सअॅपवर बनावट SMS किंवा लिंक पाठवून
४. बोगस फोन नंबरवरून कॉल करून फायनॅन्शिअल डिटेल्स मागणे
५. रिफंड अमाउंटचं आमिष दाखवणं

फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय कराल?

बोगस फोन कॉल्स आल्यास ग्राहकांनी ते त्वरीत कट करावे, असे आवाहन स्विगीने दिलेय. फसवणूक करणाऱ्यांशी कंपनीचा काहीही संबंध नाही. तसंच कुठल्याही फोन नंबरवरून तुम्हाला असे फोन कॉल्स आले तर तात्काळ स्विगीला कळवा आणि बँकेलाही माहिती द्या, असं स्विगीने म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here