नाशिकः महापालिकेच्या जुने नाशिक भागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळती लागली होती. या दुर्घटनेत अनेकांनी जीव गमावले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या आक्रोशानं रुग्णालयातील शांतता भेदली गेली.

प्रेशरमुळं नोझल तुटले व त्यातून गॅस गळती झाल्याची माहिती देण्यात येत आहे. व्हॅटिलेंटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन गळतीचा फटका बसला असून आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर, रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर हलगर्जी केल्याचा आरोप केला आहे.

‘ऑक्सिजन पुरवठा लीक झाल्यामुळं आमच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे. जे रुग्ण बरे होत होते त्यांचाही मृत्यू झाला आहे. दोषींवर कारवाई झाली पाहीजे,’ अशी संतप्त मागणी मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

‘कोविड रुग्ण ऑक्सिजनशिवाय जगूच शकत आहेत. काल आमच्या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल ८४ होती. आमचा रुग्ण व्यवस्थित चालत होता. पण आज सकाळी येऊन बघतो तर अचानक ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला आणि आमच्या रुग्णांची प्रकृती गंभीर झाली. आज या रुग्णांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार?,’ असा सवाल एका नातेवाईकांनी केला आहे.

तर, ‘दहा मिनिटांच्या ऑक्सिजनसाठी किती जीव गेले. या निर्दयी प्रशासनाला आणि व्यवस्थेला जाग केव्हा येणार? इतके जीव घेऊनही आरोग्याशी खेळ’, अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली आहे.

परिसर सील

जाकीर हुसेन हॉस्पिटलच्या परिसरात पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी भेट दिली असून हा परिसर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. हा परिसर संध्याकाळी पर्यंत सील राहील, अशी घोषणा केली आहे. मृताच्या नातेवाई संतप्त झाल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तरीही काही नागरिक परिसरात फिरताना दिसत आहेत. हॉस्पिटलकडे येणारे सर्व रस्तेही बंद करण्यात आले असून रुग्णालयातून नातेवाईकांना बाहेर काढण्यात आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here