म. टा. प्रतिनिधी, : हॉस्पिटलच्या दारात कार्डियाक रुग्णवाहिकेतच रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण करुन हॉस्पिटलमध्ये केली. कोंढव्यातील प्राइम हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत डॉ. सिद्धांत तोतला (वय २५, रा. मार्केटयार्ड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील प्राइम हॉस्पिटलमध्ये डॉ. तोतला हे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी एक कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन आली होती. डॉ. तोतला यांनी त्याला तपासले. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना कळवले.

डॉ. ताबीश व डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णाला तपासले. रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी तेथे जमलेल्या १५ ते २० जणांना सांगितले. हे समजल्यावर त्यांनी डॉ. तोतला यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाइपने मारहाण केली. तसेच, हॉस्पिटलमधील अकाऊंटंट इमाम हुल्लर यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. सुरक्षा रक्षकाच्या केबिनची काच फोडून नुकसान केले. हॉस्पिटलसमोरील दरवाजावर दगड फेकून दरवाजासमोरील कुंडीमधील झाडे फेकून देऊन नुकसान केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here