नाशिकमधील दुर्घटनेवर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तर, मृतांच्या नागरिकांचा आक्रोश पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे. राज ठाकरे यांनीही एक ट्वीट करत दुःख व्यक्त केले आहे. तसंच, सरकारकडून दोषींना कडक शासन व्हायला हवं, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘ऑक्सिजन गळतीमुळं नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. पण जर कोणाकडून बेपर्वाई झाली असेल. तर त्यांना कडक शासन व्हायलाच हवं,’ अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
नाशिक दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लखांची मदत राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. तर, नाशिक महानगरपालिकेकडून ५ लाख मदत जाहीर केली असून एकूण १० लाखांची मदत मिळणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर, संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times