नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले. केजरीवाल यांनीही मोदींना उत्तर दिलं. धन्यवाद म्हणत केजरीवाल यांनी दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी मोदींकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ‘आप’ आणि अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन. दिल्लीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पंतप्रधान मोदींच्या ट्विटला उत्तर दिलं. केजरीवाल यांनी मोदींचे धन्यवाद मानले. आपल्या देशाच्या राजधानीला वर्ल्ड क्लास सिटी बनवण्यासाठी केंद्रासोबत मिळून काम करण्याची आपेक्षा करतो, असं केजरीवाल ट्विटमधून म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ७० जागांचे आज निकाल लागले. या निकालात अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टी’ने सलग दुसऱ्यांना प्रचंड बहुमताने विजय मिळवला. गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळी भाजपला मोठा आकडा गाठता आला नाही. सर्वांत वाईट स्थिती काँग्रेसची आहे. काँग्रेसला निवडणुकीत खातं उघडता आलं नाही. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसची मतदानाची टक्केवारीही घसरलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here