मुंबई: राज्यात आज पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार ४६८ नवीन बाधितांची नोंद झाली आहे तर ५४ हजार ९८५ रुग्ण करोनावर मात करून घरी परतण्यात यशस्वी ठरले आहेत. दरम्यान, मृतांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब ठरली असून आज करोनाने ५६८ रुग्ण दगावले आहेत. ( )

वाचा:

राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. संचारबंदी आणि कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतरही करोनाचा ग्राफ खाली आलेला नसून दैनंदिन आकडे धडकी भरवणारे ठरले आहेत. गेल्या २४ तासांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यातील स्थिती अधिकच भीषण बनत चालल्याचे दिसत आहे. राज्यात आज ५६८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या ६१ हजार ९११ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ % एवढा आहे. आज राज्यात ६७ हजार ४६८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ५४ हजार ९८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३२ लाख ६८ हजार ४४९ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ८१.१५ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४६ लाख १४ हजार ४८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४० लाख २७ हजार ८२७ (१६.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,१५,२९२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २८ हजार ३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ लाखांच्या उंबरठ्यावर

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सात लाखांच्या जवळ पोहचली आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या ६ लाख ९५ हजार ७४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक १ लाख २१ हजार २८४ रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यानंतर पालिका क्षेत्रात ८३ हजार ४५० अॅक्टिव्ह रुग्ण असून जिल्ह्यात हा आकडा ८० हजार १५५ इतका झाला आहे. जिल्ह्यात ७८ हजार ४७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नाशिक जिल्ह्यात ४६ हजार २५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत नवीन ७ हजार ६५४ रुग्णांची भर पडली आहे तर पुणे पालिका क्षेत्रात ५ हजार ५३८ रुग्ण वाढले आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here