मुंबई: अभावी करोना रुग्णांचे मृत्यू होत असताना चेंबूरच्या एका महिलेची ऐवजी गोळ्यांची भुकटी देऊन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेमडेसिवीरची ऑनलाइन मागणी केल्यानंतर या महिलेने १८ हजार रुपये भरले मात्र, तिला पॅरासिटामॉल, आदी औषधी गोळ्यांची भुकटी टाकण्यात आलेल्या कुप्या पाठविण्यात आल्या. ( )

वाचा:

येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला सहा रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज होती. तुटवडा असल्याने रुग्णालयाने नातेवाईकांनाही इजेक्शन आणण्यास सांगितले. या रुग्णाच्या नातेवाईक महिलेने सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली. महिलेने जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधला व सहा कुप्यांची मागणी केली. या सहा कुप्यांसाठी तिने ऑनलाइन १८ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर महिलेच्या घरी पार्सल आले. तिने ते उघडले तेव्हा त्यात पाच कुप्या होत्या. प्रत्येक कुपीत रेमडेसिवीर नसून औषधी गोळ्यांची भुकटी होती. हे पाहून महिलेला धक्काच बसला.

महिलेने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठाण्यात धाव घेत तक्रार केली. महिलेने दिलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस फसवणूक करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here