ठाणे: शहरातील येथे रिक्षावर अचानक झाड कोसळून चालक व प्रवासी अशा दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडल्याची माहिती कक्षाकडून देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे समजू शकली नाहीत. ( )

वाचा:

रिक्षावर (रिक्षाचा क्र. एमएच ४७ एझेड ४८२२ ) झाड कोसळल्याचे समजताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान तसेच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केला. ही दुर्घटना तलावपाळी येथे समोरील रस्त्यावर घडली आहे. रिक्षातील दोघांनाही सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही रिक्षा कोठून कोठे निघाली होती, हे समजू शकले नाही. रिक्षातील दोघांची ओळखही अद्याप पटलेली नाही.

वाचा:

दरम्यान, ठाण्यातील तलावपाळी भागात नेहमीच वाहनांची आणि माणसांची मोठी वर्दळ असते. सध्या कोविड निर्बंध लागू करण्यात आलेले असल्याने व रात्री ८ वाजल्यानंतर संचारबंदी असल्याने या भागात फारशी वर्दळ नव्हती. तरीही रिक्षाला मात्र या विचित्र दुर्घटनेला सामोरे जावे लागले. झाड अचानक कोसळल्याने रिक्षाचालक काहीच करू शकला नाही. त्याला आणि सोबत रिक्षात असलेल्या प्रवाशाला प्राणास मुकावे लागले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here