नवी दिल्लीः देशात करोना संसर्गाने चिंता वाढवली आहे. करोनाचा प्रादुर्भाव आता अतिशय झपाट्याने वाढत असल्याचं आकडेवारीवरून समोर येत आहे. आता बुधवारी देशात करोनाचे ३ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसंच २१०० हून अधिक जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या ७ दिवसांत देशात १८ लाखांहून अधिक नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. याच्या आधीच्या आठवड्यात ही संख्या १० लाखांहून अधिक होती. ही आकडेवारी वल्डोमीटर आणि कोविड १९ इंडिया ओआरजीवरून मिळाली आहे. गेल्या २४ तासांत ३ लाख १५ हजार ४७८ नवीन रुग्ण आढळून आले. १,७९,३७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर २१०१ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

नवीन रुग्णांची भर पडल्याने देशातील करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही आता १ कोटी ५९ लाख २४ हजारांवर गेली आहे. तर आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ४९ जण करोनातून बरे झाले आहेत. करोनाने १,८४, ६७२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २२ लाख ८४ हजार २०९ इतकी आहे.

देशातील १४६ जिल्ह्यांमध्ये करोनाचा संसर्गाचा वेग मोठा आहे. १५ टक्क्यांहून अधिक आहे. देश करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या मध्यात आहे, तरीही देशात करोना रुग्ण वाढत आहेत. यामुळे करोना रुग्णांची संख्या कधी कमी होईल हे सांगणं कठीण झालं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here