मुंबई: महाराष्ट्रात अंतर्गत आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ताज्या आदेशात हा शब्द वापरण्यात आला नसला तरी पूर्वीच्या लॉकडाऊनसारखेच कठोर निर्बंध आता असणार आहेत. मुख्यमंत्री हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधून याबाबत घोषणा करणार होते मात्र, नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी हा संवाद रद्द केल्याचे कळते. ( )

वाचा:

राज्यात संसर्गाने थैमान घातले आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन लावला जाणार असे स्पष्ट संकेत मिळाले होते. राज्यात कडक निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी फेसबुक तसेच इतर माध्यमांतून जनतेशी लाइव्ह संवाद साधून जाहीर करतील असेही सांगण्यात येत होते. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर तशी विधाने अनेक प्रमुख मंत्र्यांनी केली होती. मात्र, नाशिकमध्ये आज महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन गळती होवून २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला ऑनलाइन संवाद रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ऐवजी हा निर्णय राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या मार्फत जाहीर करण्यात आला आहे.

वाचा:

कुंटे यांच्या स्वाक्षरीने ब्रेक द चेन अंतर्गत नवा आदेश आज जारी करण्यात आला आहे. त्यानुसार निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. त्यात सर्वसामान्यांना लोकल रेल्वे, मेट्रो, मोनो तसेच बस प्रवास पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याशिवाय अत्यावश्यक कार्यालये सोडली तर इतर सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयात केवळ १५ उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. याशिवाय खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकल रेल्वे मधून केवळ केंद्रातील, राज्यातील तसेच स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून प्रवास करण्याची मुभा असेल. याशिवाय डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्राच्या माध्यमातून लोकल, मोनो, मेट्रो तसेच बस मधून प्रवास करता येईल. वैद्यकीय उपचार घेण्याऱ्यांना तसेच दिव्यांगाना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तीच्या सोबत एका व्यक्तीला प्रवासाची परवानगी असेल. मात्र सर्वसामान्यांना विनाकारण प्रवासावर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्ये ५ कर्मचारी किंवा १५ टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.

वाचा:

एका शहरातून दूसऱ्या शहरात वा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातून जाण्याकरीता सबळ कारण लागेल. आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्यांना कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले असेल वा नातेवाईक आजारी असेल तरच अशा सबळ कारणासाठी प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. खासगी बसेसना परवानगी असली तरी त्यासाठी सबळ कारण लागेल. शिवाय खासगी आणि सरकारी वाहतूक ५० टक्के क्षमतेनेच चालवावी लागणार आहे. लांब पल्याच्या रेल्वे आणि बस मधून प्रवास करणाऱ्याची स्थानिक प्रशासनाकडून तपासणी होईल. दोनच थांबे घ्यावे लागतील आणि संबंधित व्यक्तीला १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे लागेल. प्रवाशांची थर्मल स्कॅनरने तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. हे नियम तोडणाऱ्यांना दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शहरातल्या शहरात प्रवास करताना सबळ कारण लागेल. लग्न समारंभासाठी आधी ५० पाहूण्यांना परवानगी होती, त्यानंतर ती २५ करण्यातआली मात्र आता २५ जणांनाच परवानगी असेल मात्र लग्नसोहळ्याला केवळ दोनच तास परवानगी देण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांना ५० हजारांचा दंड आकारला जाईल.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here