वाचा:
डॉ. सय्यद हे मूळचे सोलापूरकर आहेत. शहरातल्या पद्मशाली चौकात त्यांनी ‘नोबल सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या नावाने नव्यानेच सहा मजली हॉस्पिटल उभारले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्याचा डॉक्टरांचा मनोदय होता. पण हॉस्पिटलचे फर्निचर काम शेवटच्या टप्प्यात आले त्याच दरम्यान सोलापूर शहरात करोना बाधित रुग्णांचे आकडे वाढत चालले होते. पुढे ही परिस्थिती हाताबाहेर गेली अन् शहरात ऑक्सिजन बेडस आणि रेमडीसीविरचा तुटवडा निर्माण झाला. प्रशासकीय आकडे आणि प्रत्यक्षात असलेली परिस्थिती ही विषम होती. करोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक शहरभर बेडसाठी शोधा शोध करत होते. त्यावेळी व्यावसायिक लाभाच्या पलीकडे माणुसपणाचे भान असलेल्या संवेदनशील डॉ. अमजद सय्यद यांना प्राप्त परिस्थितीची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी उद्घाटन बाजूला ठेवत मानवतेच्या भावनेतून आपले हॉस्पिटल करोना रुग्णांसाठी देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगर पालिकेला पाठवला. त्यानंतर आरोग्य यंत्रनेनं या हॉस्पिटलची पाहणी करून अतिरिक्त बेड्सची व्यवस्था केली आहे. आज इथं पन्नासावर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना नाममात्र दरात वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारीसुद्धा डॉ. सय्यद यांनी उचलली आहे.
वाचा:
१९३८ मध्ये चीन आणि जपानच्या युद्धात भारताकडून चिनी सैनिकांवर मानवतेच्या भावनेतून उपचार करणाऱ्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा वारसा सोलापूर शहराला आहे. त्या इतिहासाला डॉ. सय्यद यांच्या दातृत्वाने परत एकदा नव्याने उजाळा मिळाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times