वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. मलिक यांनी केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेला रेमडेसिविरचा नवा चार्ट ट्वीट केला आहे. त्यावर मलिक यांनी भूमिका मांडली आहे. त्यात ते म्हणतात, ‘देशातील विविध राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविरचे आकडे केंद्र सरकारनं नुकतेच जाहीर केलेत. महाराष्ट्राची गरज दिवसाला ५० हजार इंजेक्शनची आहे. राज्य सरकार सातत्याने तशी मागणी करत आहे. मात्र, सध्या आपल्याला दिवसाला ३६ हजार इंजेक्शन मिळत आहेत. नव्या निर्णयामुळं ही संख्या आणखी कमी होणार आहे. महाराष्ट्राला दिवसाला केवळ २६ हजार इंजेक्शन मिळतील. त्यामुळं सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील परिस्थिती आणखी बिकट होईल,’ असं मलिक यांनी म्हटलं आहे. ‘केंद्र सरकारनं महाराष्ट्राची दिवसाची ५० हजारची इंजेक्शनची गरज पूर्ण करावी,’ अशी आग्रही मागणीही मलिक यांनी केली आहे.
राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढतच असून बुधवारी ६७,४६८ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, ५६८ जणांचा मृत्यू झाला. कालच्या दिवसात एकूण ५४,९८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळं राज्यातील करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ८१.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यात ३९,१५,२९२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर २८,३८४ व्यक्ती संस्थात्मकक्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times