नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व ७० जागांचे निकाल जाहीर झालेत. निवडणुकीत ‘आप’ ६२ जागा जिंकल्या. तर भाजपला फक्त ८ जागा जिंकता आल्या. काँग्रेसने तर भोपळाही फोडला नाही. काँग्रेसने एकही जागा निवडणुकीत जिंकलेली नाही.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदम पार्टी’ने भाजप आणि काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे. या निवडणुकीत सलग दुसऱ्यांना एकतर्फी विजय मिळवण्यात ‘आप’ला यश आलं आहे. दिल्ली विधानसभेच्या सर्वच्या सर्व ७० जागांचे निकाल जाहीर झालेत. निवडणुकीत ‘आप’ला ६२, भाजप ८ आणि काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाहीए.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह ‘आप’च्या सर्व उमेदवारांचा निवडणुकीत दणदणीत विजय झाला. मात्र, २०१५च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ‘आप’चे यंदा ५ जागांचे नुकसान झाले. ‘आप’ने २०१५मध्ये ६७ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली नसली ५ जागांचा फायदा झालाय. २०१५मध्ये भाजपने ३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपने ८ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने २०१५मध्ये एकही जागा जिंकली नव्हती आणि आताही काँग्रेसचा एकही जागेवर विजय झाला नाही.

अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झालेत. २०१३, २०१५ आणि २०२०च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला पुन्हा यश मिळालंय. २०१३मध्ये केजरीवाल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा पराभव केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या पाठिंब्याने केजरीवाल यांनी दिल्लीत सत्ता स्थापन केली. पण हे सरकार फक्त ४९ दिवस टिकले. भ्रष्टाचाराविरोधात कठोर कायदा न करून शकल्याच्या कारणावरून केजरीवाल यांचे सरकार कोसळले. पण २०१५ च्या निवडणुकीत मात्र ‘आप’ने जोरदार मुसंडी मारली आणि ७० पैकी ६७ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली. केजरीवाल यांनी यावेळी विकासाच्या मुद्द्या निवडणूक लढवली आणि त्यांना पुन्हा यश मिळाले. दिल्लीच्या जनतेने विश्वास दाखवत केजरीवाल यांना तिसऱ्यांना मुख्यमंत्री केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here