‘राज्य सरकार सर्व प्रकारे अक्षरशः नम्र विनंती करायलाही तयार आहे, पाया पडायलाही तयार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉरकरुन महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे,’ असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
‘आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्यागधंद्यांमध्येदेखील पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. त्यांचादेखील आपण वापर करु शकतो का? याची चाचपणी सुरु आहे,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
‘२१ एप्रिल ते १ मेपर्यंत दिवसाला २६ हजार रेमडेसिवीर मिळणार आहेत. मात्र, रोज १० हजार रेमडेसिविरची कमतरता भासणार आहे. याबाबत एक बैठक घेऊन तोडगा काढणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळं राज्य सरकारसमोर अडचण निर्माण होणार आहे. केंद्र सरकारने या प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडवावा,’ असं आवाहन टोपेंनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times