मुंबईः महाराष्ट्राक करोना रुग्णांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या संख्येनं आरोग्य प्रशासनावर ताण येत आहे. अशातच, आता अनेक रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. राज्यातही ऑक्सिजनचा तुटवडा असताना इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. या प्रसंगी केंद्रीय मंत्री महाराष्ट्रासाठी धावून आले आहेत.

नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळणार आहे. येत्या काही दिवसांत विशाखापट्टणम यथून पुरवठा सुरु होईल, त्यामुळं विदर्भ व मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे.

वाचाः

भिलाईमधूनही ६० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा सुरु आहे. तसंच, ५०हुन अधिक बेडची क्षमता असणाऱ्या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरु करण्याची विनंतीही गडकरींनी रुग्णालयांना केली आहे.

दरम्यान, नागपूर विभागात १६८ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. मध्य प्रदेशातून भिलाई येथून १०७ मेट्रिक टनचा नियमित पुरवठा होतो. असे असतानाही ऑक्सिजनची गरज पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्याचीच गरज १५० मेट्रिक टन आहे. ही वाढती गरज लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून अतिरिक्त ऑक्सिजनच्या साठा विदर्भात पोहोचला तर त्यामुळं निश्चितच दिलासा मिळणार आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here