सोलापूरः यांचे पवित्र रमजान महिन्यात निधन झाले आहे. आज गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या महिन्याभरापासून ते अस्वस्थ होते. मृत्यूसमयी ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा बदिउज्जमा बिराजदार असून ते नावाजलेले गझलकार साबीर शोलापुरी या नावाने प्रसिद्ध आहेत. दोन मुली व नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.

बिराजदार हे मूळचे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील आहेत. सोलापुरातील महानगर पालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांत प्रावीण्य मिळवले. बिराजदार यांनी मुस्लिमबांधवांचा कुराण-शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरित केला आहे. या ग्रंथात एकूण ६०० पाने आहेत. विशेष म्हणजे, दस्तगीर यांच्या तीन्ही मुलांची आणि नातीच्या लग्नाची पत्रिका संस्कृतमधून होती. तिच्यात वेदांतील ऋचांचा समावेश होता.

बिराजदार यांची पुस्तके –

वेदादि-शोधबोध, मुस्लिम-संस्कृत-सेवका: ‘विश्वभाषा’ सम्पादकीयमौक्तिकानी, मुस्लिमानां संस्कृताभ्यासो अन्ये चापि लेखा:

त्यांना मिळालेले पुरस्कार-

बिराजदार यांना १८हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. राष्ट्रीय-शिक्षक-पुरास्कार केन्द्र शासनं १९८३, संस्कृत-पण्डित्याय राष्ट्रपति पुरस्कार १९९८, महाराष्ट्र राज्य-संस्कृत-पण्डित-पुरस्कार: महाराष्ट्र विधानसभा १९९३, उज्जैनहून परशुरामश्री, तिरुपतीहून वाचस्पती, नाशिकहून विद्यापारंगत, वाराणसी येथून महापण्डित आणि पण्डितेंद्र, सोलापूरहून संस्कृतरत्नम्‌

पंडित बिराजदार हे औरंगाबाद येथे जानेवारी २०१८मध्ये झालेल्या तीन दिवसीय वैदिक संमेलनामध्ये खास निमंत्रित होते. वेदाचे अभ्यासक व संस्कृत पंडित म्हणून तेथे २१-१-२०१८ रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘मुक्तछंद’ संस्थेतर्फे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बिराजदार यांच्यासह प्रसिद्ध लेखक वसंत वसंत लिमये, प्रसिद्ध हिंदूी साहित्यिक सुनील केशव देवधर आणि चित्रकार नीलेश जाधव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी बिराजदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

इंदिरा गांधी यांच्या काळापासून ते मंत्रिमंडळाच्या संपर्कात होते. त्यामुळे राजकीय नेते फक्त आश्वासने देतात. त्यांना प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा असली तरी नोकरशाही निर्माण करीत असलेल्या अडथळ्यांमुळे आश्वासनांची पूर्ती होत नाही, असे सांगून बिराजदार म्हणाले होते कि, शालेय अभ्यासक्रमात इयत्ता सहावीपासून संस्कृत विषय अनिवार्य करण्याचे आश्वासन तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. दरम्यान, या आश्वासनाला बरेच वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. अमेरिकेत २० लाख लोक संस्कृतचा अभ्यास करीत आहेत, संस्कृत ही आपल्या देशाची भाषा असून आपण संस्कृतचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी बिराजदार यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले होते.

त्यांचे “संस्कृत लेखक” वर्गातील लेख पुढील प्रमाणे आहेत.

काशिनाथशास्त्री वासुदेवशास्त्री अभ्यंकर, वासुदेवशास्त्री महादेवभट्ट अभ्यंकर, अशोक नरहर अकलूजकर,केशव रामराव जोशी, गुलाम दस्तगीर,वासुदेव गोपाळ परांजपे, रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी,

पं. गुलाम दस्तगीर यांची खंत

राजकीय नेते फक्त आश्वासने देतात. नोकरशाही निर्माण करीत असलेल्या अडथळ्यांमुळे त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष कृती करण्याचा अभाव दिसून येतो, अशी खंत गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी व्यक्त केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here