नजीर खान । परभणी

राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणालाही वेग आला आहे. केंद्र सरकारनं अलीकडंच ५० टक्के लस खरेदीचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत. केंद्राच्या या निर्णयानंतर लस निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने या लसीचे दरही जाहीर केले आहेत. मात्र, या दरातील तफावतीवरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ( over Covishield Rates)

परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मलिक यांनी आज शहरातील आयटीआय इमारतीतील शासकीय कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. तसंच, जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेतील नवीन इमारतीस भेट देऊन तेथील कोविड सेंटरमधील सोयीसुविधांचा आढावा घेतला. तसंच, रुग्णांशी संवादही साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

वाचा:

‘सीरम’नं बुधवारी जाहीर केलेल्या दरांनुसार, कोविशिल्ड लसीच्या प्रत्येक डोससाठी केंद्र सरकारला १५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर, याच डोससाठी राज्य सरकारला ४०० आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. नवाब मलिक यांनी सीरमच्या या निर्णयास आक्षेप घेतला आहे. ‘केंद्र, राज्य आणि खासगी लोकांना देण्यात येणाऱ्या लसीच्या दरांमध्ये ही तफावत का आहे, याचं उत्तर ‘सीरम’कडून राज्य सरकारला आणि जनतेला हवं आहे. ‘लसीच्या उत्पादन खर्च हा एकच असतो. मग वेगवेगळ्या ग्राहकांसाठी दर वेगवेगळे का? केंद्राला दिली जाणारी लस टॅक्स फ्री आहे का? राज्यासाठी आणि जनतेसाठी वेगळा टॅक्स वगैरे आहे का,’ याचं उत्तर सीरमकडून मिळणं अपेक्षित आहे,’ असं मलिक म्हणाले.

त्याचबरोबर, ‘राज्यातील नागरिकांना जगातील सर्वात चांगली आणि स्वस्त लस व औषधे मिळावीत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी एक समिती नेमली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळात याबाबत चर्चा झाली आहे. निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, राज्यातील नागरिकांना आवश्यक ती औषधे राज्य सरकार येत्या काळात खरेदी करेल,’ असं मलिक यांनी यावेळी सांगितलं.

वाचा:

परभणी दौऱ्यात मलिक यांनी जिल्ह्यातील संपूर्ण रुग्णसेवेचा व सुविधांचा आढावा घेतला. रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होणार नाही, याकडंही कटाक्षानं लक्ष द्यावं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना काही अडचण आल्यास त्यांनी संपर्क कार्यालयातील मदत केंद्रांशी संपर्क साधावा, असं आवाहनही केलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here