अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा पंचायत समितीच्या करण्यात आला. संजय हिवराळे असे गटनेत्याचे नाव असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला नेमका कोणत्या वादातून झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

संजय हिवराळे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तेथून तेल्हारा येथे ते परत येत होते. त्याचवेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपींनी त्यांना जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने अकोला येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. हिवराळे यांच्यावर कोणत्या कारणांवरून हल्ला झाला, याचा शोध घेण्यात येत आहे.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पंचायत समितीचे गटनेते संजय हिवराळे हे सध्या वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत. हिवराळे हे समाजकार्यातही नेहमी पुढे असतात. मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच ते रिंगणात उतरले आणि त्यांनी विजयही मिळवला होता. हिवराळे यांची पंचायत समितीच्या गटनेतेपदीही निवड झाली. तेल्हारा तालुक्यातील सर्वात तरूण गटनेते म्हणून ते तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here