अनिल यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘फारच वेदनादायी अशी बातमी… प्रसिद्ध संगीतकार श्रवण कोविडमुळे आपल्याला सोडून गेले. ते माझे खूप चांगले मित्र होते. आम्ही ‘महाराजा’ मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांनी नेहमीच चांगलं संगीत दिलं. त्यांच्या कुटुंबियांना धैर्य मिळावं हीच प्रार्थना. श्रवण नेहमीच आमच्या हृदयात जिवंत राहतील.’
दोन दिवसांपूर्वी त्यांना एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. श्रवण यांना करोनाबरोबरच इतर अनेक आजार असल्याने त्यांची प्रकृती नाजूक होती. श्रवण यांच्यावर डॉ. किर्ती भूषण हे उपचार करत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रवण हे व्हेंटिलेटवर होते.
त्यातच त्यांना मधुमेहाचा त्रास असून करोनाचीही लागण झाली आहे. त्यांच्या फुफ्फुसांनाही बरेच इन्फेक्शन झाले आहे. त्यातच आता हृदयाशी संबंधित समस्याही निर्माण झाल्या आहेत. त्यांचे हृदयही योग्य पद्धतीने काम करत नव्हते. यासंबंधीचे उपचारही त्यांच्यावर सुरू होते. याशिवाय श्रवण यांना मधुमेहाचाही त्रास होता.
९० च्या दशकातील हिट संगीतकार जोडी
१९९० च्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये नदीम- श्रवण या संगीतकार जोड गोळीचा दबदबा होता. नदीम सैफी मित्र श्रवण राठोड यांच्यासोबतीने गाण्यांना चाली लावायचे. त्यांनी संगीत दिलेल्या ‘आशिकी’ सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. हा सिनेमा आणि त्यातील गाणी त्या काळात सुपर हिट होती. सगळ्यांच्या तोंडी या सिनेमाची गाणी होती. या सिनेमामुळे ही जोडी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.
या संगीतकार जोडीने ‘आशिकी’नंतर, ‘साजन’, ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फूल और काँटे’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘जान तेरे नाम’, ‘रंग’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’ अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times