रेल्वेद्वारे महाराष्ट्रासाठी रोल ऑन रोल म्हणजे रोरो पद्धतीने ऑक्सिजन पुरवठा केला जातोय. नवी मुंबईच्या कळंबोली रेल्वे स्थानकातून १८ एप्रिलला रात्री ही ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला निघाली होती. आता या एक्स्प्रेसवरील ७ टँकर्समध्ये ऑक्सिजन भरण्यात आला आहे. विशाखापट्टणमच्या स्टील प्लांटमध्ये ऑक्सिजनचे हे टँकर्स भरण्यात आले. ही एक्स्प्रेस विशाखापट्टणममधून रवाना झाली ( ) आहे. उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत ही ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
ऑक्सिजन टँकर्स असलेली ही ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणममधून रवाना झाली आहे. सात ऑक्सिजनचे टँकर्स भरून ही ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणममधून गुरुवारी रात्री १ वाजेच्या सुमारास महाराष्ट्राच्या दिशेने रवाना ( oxygen express is enroute to maharashtra ) झाली आहे. एएनआयने हे वृत्त दिलं आहे. १०० टनांहून अधिक लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे महाराष्ट्राला पुरवण्यात येणार आहे.
पाच दिवसांनी ही ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होत आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा तुटवडा काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे. याने महाराष्ट्राला दिलासाही मिळणार आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र या ऑक्सिजन एक्स्प्रेसकडे डोळे लावून आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times