नाशिक: महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकी गळती होऊन झालेल्या २२ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीसाठी सेव्ह द इंडिया फाऊंडेशन या मुंबईतील सेवाभावी संस्थेने दाखल केली आहे.

ऑक्सिजन टँकरद्वारे टाकीत ऑक्सिजन भरत असताना पाईप तुटल्याने गळती होऊन २२ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी २१ एप्रिलाल घडली होती. या दुर्घटनेचे देशभरात पडसाद उमटले आहेत. राज्य शासन व महापालिकेने या दुर्घटनेतील मृतांना दहा लाखांची आर्थिक मदत जाहीर केली असून या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य शासन व महापालिकेने आपापल्या स्तरावर चौकशी समिती देखील गठीत केली आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा दावा करत दोषींवर शिक्षा होणे आवश्यक असल्याने या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश आणि उच्च न्यायालयाचे दोन माजी न्यायधीश अशी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी सेव्ह द इंडिया फाऊंडेशनने याचिकेद्वारे केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here