पानीपत रिफायनरीतर एअर लिक्विड नॉर्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऑक्सिजनचा पुरवठा करते. या कंपनीतून बुधवारी रात्री एक ऑक्सिजन टँकर सिरसाला रवाना करण्यात आला. या टँकरमध्ये ८ टन ऑक्सिजन आहे. याची किंमत जवळपास १ लाख १० हजार रुपये इतकी आहे.
पानीपतहून सिरसाला पोहोचण्यासाठी सव्वा चार तास लागतात. पण या वेळेत सिरसामध्ये टँकर न पोहोचल्याने पानीपतमध्ये कंपनीत संपर्क करण्यात आला. या प्रकरणी ड्रग कंट्रोल ऑफिसरलाही कळवण्यात आलं. आता टँकर चालकाचा फोनही बंद येत आहे. टँकरचा शोध सुरू आहे. टँकर चालकाचे शेवटचे लोकेशन बघितले जात आहे. त्याच्या नातलगांकडेही चौकशी केली जात आहे. मोबाइलचे कॉल डिटेल्स काढले जात आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या घटनेनंतर पोलिस सतर्क झाले आहेत. ऑक्सिजन टँकरला आता पोलिस सुरक्षा दिली जाईल. ज्या जिल्ह्यांमधून टँकर जातील, तेथील पोलिस टँकरला सुरक्षा पुरवतील. पुढच्या जिल्ह्यात पोलिस बदलत जातील. टँकरला जिथे पोहोचवायचे आहे तिथे पोलिस सोडतील, असं पोलिस अधिकारी म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times