नवी दिल्लीः काँग्रेस नेते आणि केरळमधील तिरुअनंतपूरचे लोकसभा खासदार ( ) हे गुरुवारी रात्री एका फेक न्यूजमुळे अडचणीत आले. माजी लोकसभा अध्यक्ष ( ) यांच्या निधनाची फेक न्यूज त्यांनी ट्वीट केली. यानंतर थरूर यांची फजिती उडाली. पण काही वेळाने थरूर यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. दुसरीकडे, थरूर यांच्या ट्वीटवर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी ट्वीट केले. ताई एकदम स्वस्थ आहेत. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो, असं विजयवर्गीय म्हणाले.

माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन या आता आपल्यात नाहीत. परमेश्वर चरणी त्यांना स्थान मिळू दे, असं ट्वीट शशी थरूर यांनी गुरुवारी रात्री केलं. यानंतर सुमित्रा महाजन यांच्याबाबत इतरांनी शोक व्यक्त केला. पण काही वेळातच सुमित्रा महाजन या ठीक असल्याचं समोर आलं. त्यांची प्रकृती थोडी बिघडली होती, असं सांगण्यात आलं. या माहितीनंतर शशी थरूर यांनी ट्वीट करून खेद व्यक्त केला.

थरूर यांनी ट्वीट डिलिट केले

शशी थरूर यांनी ट्वीट करून खेद व्यक्त केला आणि आपले ट्वीटही डिलिट केले. अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना कोण उकसवतं, याचं आपल्याला आश्चर्य आहे. सुमित्रा महाजन यांना आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा, असं थरूर म्हणाले.

शशी थरूर यांच्या ट्वीटनंतर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी ट्वीट केलं. ताई एकदम स्वस्थ आहेत. त्यांना दीर्घायुष्य मिळो, असं विजयवर्गीय म्हणाले.

शशी थरूर यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. थरूर यांनी बुधवारी ट्वीट करून याची माहिती दिली. करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आपली आई आणि बहिणही करोना पॉझिटिव्ह असल्याचं त्यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here