संपूर्ण राज्य करोनाच्या संकटाशी लढत असताना राज्यात अपघाताच्या घटना सुरूच आहेत. नाशिकनंतर आता विरारमध्ये दुर्घटना घडली आहे. येथील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊ या संदर्भातील घडामोडी…

लाइव्ह अपडेट्स:

आगीच्या दुर्घटनेनंतर रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी. पोलीस बंदोबस्तात वाढ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले चौकशीचे आदेश; एएनआयची माहिती

अत्यवस्थ असलेल्या अन्य २१ रुग्णांना इतरत्र हलविल्याची रुग्णालयाचे डॉ. दिलीप शहा यांची माहिती

मृतांची नावे पुढीलप्रमाणे: निलेश भोईर (वय ३५), उमा सुरेश कनगुटकर (६३), पुखराज वल्लभदास वैष्णव (६८), रजनी आर कडू (६०), जनार्दन मोरेश्वर म्हात्रे(६३), नरेंद्र शंकर शिंदे (५८), रमेश टी उपयान (५५), कुमार किशोर दोशी (४५), शमा अण्णा म्हात्रे (४८), सुप्रिया देशमुख (४३), प्रविण शिवलाल गौडा (६५), अमेय राजेश राऊत (२३), सुवर्णा एस पितळे (६४)

आगीत १३ कोविड रुग्णांचा होरपळून मृत्यू

एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्यामुळं आग भडकल्याची प्राथमिक माहिती

(क्लिक करा आणि वाचा संपूर्ण बातमी)

दुर्घटनाग्रस्त रुग्णालयात सुरू होते कोविड रुग्णांवर उपचार

विजय वल्लभ हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात मध्यरात्री तीनच्या सुमारास लागली आग

महाराष्ट्र पुन्हा हादरला; विरारमध्ये कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ कोविड रुग्णांचा मृत्यू

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here