वाचा:
‘राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणा करोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी, क्लेशदायक आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ‘पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरू राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत,’ असं अजितदादांनी म्हटलं आहे.
‘रुग्णालयांची सुरक्षितता, फायर ऑडिट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रुटी कायमस्वरूपी दूर करण्याची बाब गांभीर्याने घेतली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times