प्रवीण खंदारे ।

कोविड सेंटरमधील असुविधा व गैरसोयींचा अनुभव सर्वसामान्य रुग्णांना नवा नाही. आतापर्यंत अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. मात्र, नांदेडमध्ये खुद्द सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनाच कोविड रुग्णालयातील हलगर्जी आणि बेफिकिरीचा सामना करावा लागला आहे. आमदार यांनी याबाबत तक्रार केली असून रुग्णालय प्रशासनाची कानउघडणी केली आहे.

नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारासाठी ते गुरुगोविंद सिंगजी रुग्णालयात दाखल झाले. तिथं रुग्णांना वेळेवर नाश्ता मिळत नसल्याची व जेवणही निकृष्ट दिलं जात असल्याची तक्रार कल्याणकर यांनी केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर आणि डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे त्यांनी संबंधित कंत्राटदाराची तक्रार केली आहे.

वाचा:

सकाळी ७ वाजता रुग्णांना दिला जाणारा नाश्ता सकाळी ९ वाजून गेल्यानंतरही रुग्णांपर्यंत पोहोचला नव्हता. जेवण पौष्टिक नाही आणि नाश्ता पॅकबंद डब्यात देण्याऐवजी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये देण्यात येत असल्याचे आमदार कल्याणकर यांनी निदर्शनास आणलं आहे. रुग्णालयात जेवण आणि नाश्ता पुरविणाऱ्या कंत्राटदारास कल्याणकर यांनी चांगलेच फैलावर घेतले.

‘एका लोकप्रतिनिधीला कोविड उपचाराच्या वेळी जेवण आणि नाश्त्याच्या बाबतीत अडचणी उद्भवत असतील तर सर्वसामान्य लोकांचे काय हाल होत असतील, अशी चर्चा यामुळं नांदेडमध्ये सुरू झाली आहे.

वाचा:

जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळं ज्यादा दर आकारले जात आहेत, याबाबतही अनेक तक्रारी येत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here