पुणे: ‘ यांच्या इफिशियन्सीबद्दल मला कौतुकच आहे. काही मंत्र्यांचा दिवस सकाळी ११ शिवाय उगवत नाही, पण ते सात वाजता मंत्रालयात असतात हे खरं आहे. मात्र, त्यांच्यावर कामाचा ताण येत असेल तर त्यांनी पुण्यातून राज्य चालवावं किंवा पुण्याला दुसरा पालकमंत्री देऊन मुंबईतून राज्याचा कारभार पाहावा, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी शुक्रवारी केलं. राज्य चालवण्याच्या या वक्तव्यातून चंद्रकांत पाटलांना नेमकं काय सांगायचंय? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ()

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नगरसेविका मंजुषा खर्डेकर यांच्या प्रयत्नातून एसएनडीटी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

वाचा:

अजित पवार पुणेकरांना उपलब्ध नाहीत, असे वक्तव्य पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याला अजित पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज उत्तर दिलंय. अजित पवारांनी आपल्या दैनंदिन कामकाजाचा लेखाजोखाच पत्रकातून मांडलाय. तसंच, माझ्यावर आरोप करणाऱ्यांचा हेतू व मेंदू तपासण्याची गरज आहे, अशी तोफही डागलीय.

वाचा:

अजितदादांच्या या टीकेवर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ‘अजित पवार उपलब्ध नाहीत असं मी म्हणालो, त्या दिवशी ते खरोखरंच २४ तास उपलब्ध नव्हते. त्यांच्यावर टीका करण्याचा हेतू नव्हता. अजित पवार यांच्या कार्यक्षमतेबद्दल माझ्या मनात शंका नाही. सर्वच प्रकारच्या कार्यक्षमतेबद्दल मी बोलतोय. मात्र ते आता केवळ व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांना उपलब्ध होत आहेत. त्यांनी तसे न करता आता लोकांना भेटले पाहिजे. लोकांना दिलाशाची गरज आहे.’

शरद पवारांचा एक फोन चित्र पालटू शकतो

आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचा शरद पवार यांना उत्तम अनुभव आहे. भूजच्या भूकंपाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती. किल्लारीचं संकट केवळ पवारांमुळंच निभावलं. आता ते आजारी आहेत. त्यामुळं घरात आहे. मात्र त्यांना घरात यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास त्यांचं मार्गदर्शन घेता येईल. त्यांचा एक फोन चित्र पालटू शकतो,’ अशी सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here