मुंबई: विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत १३ करोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानं राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ही नॅशनल न्यूज (घटना) नाही. राज्य सरकारच्या वतीनं आवश्यक ती सर्व मदत केली जाईल,’ असं टोपे यांनी म्हटलं आहे. मात्र, ‘ही नॅशनल न्यूज नाही’ या त्यांच्या वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ( on Virar Covid Hospital Fire)

वाचा:

विरार रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माध्यमांनी आज टोपे यांना गाठले. त्यावेळी त्यांनी राज्याच्या गरजांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं. ‘ऑक्सिजन व रेमडेसिविरच्या पुरवठ्यासाठीही बोलणी सुरू आहेत. आजच्या घटनेचीही माहिती दिली जाईल. ही नॅशनल न्यूज नाही. त्यामुळं राज्य सरकारच्या अखत्यारीत आम्ही सर्व प्रकारची मदत करू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे ५ लाख व महापालिकेतर्फे ५ लाख अशी एकूण दहा लाख रुपयांची मदत केली जाईल, असं टोपे यांनी सांगितलं. त्याचबरोबर, फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट व इलेक्ट्रिकल ऑडिट हे सर्वच इमारतींना सक्तीचं असतं. ह्याची अंमलबजावणी होत नसेल तर कठोर कारवाई केली जाईल. आजच्या दुर्घटनेची चौकशी केली जाईल आणि त्यातील दोषींवर शंभर टक्के कारवाई केली जाईल, असं टोपे म्हणाले.

वाचा:

‘विरार रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या प्रती मी सहवेदना व्यक्त करतो,’ असंही टोपे म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here