विदिशाः मरणानंतरही करोना बाधितांचे हाल काही संपत नाहीए. करोना बाधितांच्या मृतदेह हाताळण्याबाबत ( ) यापूर्वीही अनेक ठिकाणी हलगर्जीपणा दिसून आला आहे. आता मध्य प्रदेशातील विदिशा मेडिकल कॉलेजमधील हलगर्जीपणाची आणखी एक घटना समोर आली आहे. शव घेऊन जाणाऱ्या वाहनातून करोना बाधिताचा मृतदेह भर रस्त्यावर पडला.

एका वाहनात एकावेळी फक्त दोन मृतदेह ठेवता येतात. पण या वाहनात तीन मृतदेह ठेवण्यात आले होते. हे मृतदेह स्ट्रेचरवर ठेवण्यात आले होते. धावत्या गाडीमुळे स्ट्रेचर वाहनाच्या फाटकाला धडकले आणि फाटक उघडले गेले. फाटक आणि मृतदेह रस्त्यावर पडले. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही गाडी मध्य प्रदेश रक्त सहकार्य समितीचे होते. हे विदिशा मेडिकल कॉलेजला लागून आहे आणि खूप जुने झाले आहे. काही जणांनी वाहनातून मृतदेह खाली पडल्याचे पाहिले. यानंतर त्यांनी जोरजोरात आवाज देऊन चालकाला थांबवले. यानंतर मृतदेह पुन्हा वाहनात ठेवण्यात आला.

जिंवत व्यक्तीना दोनदा मृत घोषित केले

विदिशातील अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या हलगर्जीपणाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या १३ तारखेला एका करोना बाधित रुग्णाला दोन वेळा मृत घोषित करण्यात आले होते. नातेवाईकांना मृत्युचा दाखलाही दिला गेला. कुटुंबातील काही सदस्य अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेले. अंत्यसंस्काराची तयारी करू लागले. मृतदेह येण्याची ते वाट पाहत होते. त्याचवेळी फोन आला. रुग्ण जिंवत असल्याचं मेडिकल कॉलेजकडून सांगण्यात आलं. श्वास थांबल्याने ही समस्या निर्माण झाली होती, असं डीन म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here