मुंबई: स्टील प्लॅट सायडिंगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या ७ (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे पहिली आज रात्री ८ वाजता महाराष्ट्रात पोहचली. रेल्वे स्टेशनवर ही एक्स्प्रेस दाखल झाली असून राज्यासाठी ही खूप मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ( Maharashtra )

वाचा:

नागपूर स्टेशनात ऑक्सिजन एक्स्प्रेस मधील ३ टँकर उतरविण्यात येणार असून उर्वरित टँकर स्थानकात उतरविण्यात येणार आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेस उद्या सकाळी नाशिक रोड स्टेशनवर पोहोचणार आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. गेल्यावर्षीही लॉकडाऊन काळात रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली होती आणि पुरवठा साखळी कायम ठेवली होती. आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे राष्ट्र सेवेसाठी नेहमीच सज्ज असून ऑक्सिजन एक्स्प्रेस त्याच भावनेतून चालवल्या जात असल्याचेही रेल्वेने नमूद केले आहे.

वाचा:

दरम्यान, महाराष्ट्रात दाखल झालेली ही पहिलीच ऑक्सिजन एक्स्प्रेस आहे. हा राज्यासाठी खूप मोठा दिलासा आहे. राज्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना ऑक्सिजनची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावल्याच्या तसेच रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवावे लागण्याच्या घटना सध्या दररोज घडत आहेत. ही भीषण स्थिती लक्षात घेऊन ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकारचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. आज पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल झाल्यानंतर आणखीही ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्यासाठी तसेच ऑक्सिजन साठा वाढवण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here