चेन्नई : कर्णधार केएल राहुल (नाबाद ६० ) आणि ख्रिस गेल (नाबाद- ४३)च्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने गत विजेत्या मुंबई इंडियन्सवर ९ विकेटनी शानदार विजय मिळवला. मुंबईने दिलेले १३२ धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले आणि या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्याआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर १३१ धावा केल्या होत्या.

वाचा-

पंजाबच्या डावाची सुरूवात राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावा केल्या. मयांक २५ धावांवर बाद झाला. त्यानंतर ख्रिस गेल आणि राहुलने विजायचे लक्ष्य सहजपणे पार केले. राहुलने ५२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६० धावा केल्या. तर गेलने ३५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.

वाचा-

आजच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या गुणतक्यातील स्थानावर कोणताही फरक पडलेला नाही. ते चौथ्या स्थानावर कायम आहेत. पाच सामन्यातील त्यांचा हा तिसरा पराभव आहे. पंजाबला मात्र या विजयाचा मोठा फायदा झाला आहे. त्यांनी सातव्या क्रमांकावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली.

वाचा-

त्याआधी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दीपक हुड्डाने दुसऱ्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला ३ धावांवर माघारी पाठवले आणि मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर इशान किशन ६ धावांवर बाद झाला. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. पहिल्या १० षटकात मुंबईला फक्त ४८ धावा करता आल्या.

वाचा-

धावसंख्या कमी असली तरी
आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. या जोडीने संघाला १००च्या पुढे नेले. ही जोडी पुन्हा एकदा रवी बिश्नोईने फोडली. त्याने सूर्यकुमारला ३३ धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतक करणारा रोहित शर्मा ६३ धावांवर माघारी परतला. त्याने ५२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले.

वाचा-

मधळ्या फळीतील हार्दिक पंड्या पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. तो ४ चेंडूत एक धाव करून बाद झाला. अखेरच्या चार षटकात मुंबईला फक्त २६ धावा करता आल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here