सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील विक्रम सिंह हे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निरोपाच्या समारंभात बोलत असताना हे गुपित उघड झालं. अयोध्याप्रकरणी मध्यस्थीसाठी तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने मार्च २०१९ मध्ये समिती नेमली होती.
अभिनेता शाहरुख खानही यासाठी तयार होता. पण ही प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. अयोध्या प्रकरणावर मध्यस्थाच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो, असं या प्रकरणी सुनावणीच्या सुरवातीच्या टप्प्यात न्यायमूर्ती बोबडे यांना वाटत होत, अशी माहिती सिंह यांनी दिली.
शाहरुख समितीत सहभागी होईल का?
अयोध्याप्रकरणी मी आपल्याला माझं आणि न्यायमूर्ती बोबडेंचं एक गुपित सांगतो. मध्यस्थी करणाऱ्या समितीत सहभागी होईल का? असा प्रश्न न्यायमूर्ती बोबडे यांनी मला विचारला होता. मी शाहरुख खानच्या कुटुंबाला ओळखत असल्याचं त्यांना माहिती होतं. आपण शाहरुख खानशी यासंबंधी चर्चा केली होती आणि त्याने तयारीही दर्शवली होती, असं सिंह म्हणाले.
शाहरुख म्हणाला होता- मंदिराची पायाभरणी मुस्लिमांद्वारे केली जावी आणि…
मंदिराची पायाभरणी ही मुस्लिमांद्वारे केली जावी आणि मशिदीची पायाभरणी हिंदूंकडून. पण मध्यस्थीची प्रक्रिया फिस्कटली आणि ही योजना मध्येच सोडून द्यावी लागली, असं सिंह यांनी सांगितलं. मध्यस्थी करणाऱ्या समितीत सोर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एफएमआय कलीफुल्ला, आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर आणि वरिष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश होता.
नोव्हेंबर २०१९ मध्ये शरद बोबडे ४७ वे सरन्यायाधीश झाले
नोव्हेंबर २०१९ मध्ये देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे यांनी शपथ घेतली होती. ते शुक्रवारी सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ऐतिहासिक राम जन्मभूमी प्रकरणाचा निकालासह अनेक महत्त्वाचे निकाल दिले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times