सोलापूर: हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नसतानाच इथं एक भयंकर प्रकार समोर आला आहे. सोलापुरातील विजापूर नाका परिसरात एका अल्पवयीन मुलीवर झाला आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. इतरांचा शोध सुरू आहे.

वाचा:

पीडित मुलगी सोलापुरातील एका कॉलेजात शिकते. तिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. या तरुणाचे इतर मित्र मागील जुलै महिन्यापासून तिच्यावर अत्याचार करत होते. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असहाय्य अवस्थेत रडत असलेल्या या पीडितेची माहिती एका स्थानिकानं पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासातून ही घटना उघडकीस आली.

वाचा:

पीडित मुलीनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लगेचच कारवाई करून पाच आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून अन्य आरोपीची माहिती घेतली जात असून पोलीस पथकं शोधासाठी रवाना झाली आहेत. या प्रकरणातील बहुतेक आरोपी रिक्षाचालक असल्याचं समजतं. आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३७६ (ड), पॉस्को आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here