वाचा:
कोविड संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लादण्यात आले असतानाही मुंबईतील रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी होत नसल्याने पोलिसांनी कलर कोड पद्धती आणली होती. १७ एप्रिल रोजी हा निर्णय झाला होता. अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी हे तीन कलरचे कोड निश्चित करण्यात आले होते. हे स्टिकर असलेली वाहनेच रस्त्यावर धावू शकतील, असेही नमूद करण्यात आले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त यांनीही याबाबत एक व्हिडिओ संदेश जारी केला होता.
वाचा:
अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार, मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा कोड असणार आणि भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड असणार, असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, ही पद्धती लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना मोठा गोंधळ उडत असल्याचे पाहायला मिळत होते. नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम होताच शिवाय पोलिसांसाठीही मनस्ताप झाला होता. ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times