चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पुन्हा एकदा नैसर्गित आपत्तीनं धडक दिलीय. चमोली जिल्ह्याच्या नीती खोऱ्याच्या सुमनाच्या पुढे मोठ्या प्रमाणावर झालेल्या वर्फवृष्टीमुळे या भागात घडल्यानं अनेक रस्त्याचं काम करणारे अनेक मजूर इथं अडकून पडले होते. भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, () चा एक कॅम्प अचानक धडकलेल्या बर्फाच्या वादळात सापडला. भारतीय लष्कराच्या हाती अद्याप दोन मृतदेह लागले असून तब्बल २९१ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय.

नेमकी कुठे घडली ही घटना?

शुक्रवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ४.०० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. उत्तराखंडमधील सुमना – रिमखिम रस्त्यावर सुमनापासून सुमारे ४ किमी पुढे एका हिमस्खलन होऊन बर्फाच्या वादळानं या भागाला धडक दिली. भारत – चीन सीमेपासून अगदी काही किलोमीटर अंतरावर जोशीमठ – मलेरी- गिरिथोब्ला – सुमना- रिमखीम रस्त्यावर हा भाग आहे.

रस्ते बांधकाम करणारी ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ची (BRO) एक तुकडी आणि दोन कामगार शिबिरं या मार्गावर स्थित होती. तर सुमनापासून जवळपास ३ किलोमीटर अंतरावर ‘आर्मी कॅम्प’ आहे. गेल्या पाच दिवसांपासून या भागात मुसळधार पावसासह बर्फवृष्टीही सुरू होती. अजूनही ही बर्फवृष्टी सुरूच आहे.

वाचा : वाचा :

लष्कराकडून बचावकार्य हाती

हिमस्खलनाची माहिती मिळताच भारतीय लष्कराकडून तातडीनं बचावकार्य हाती घेण्यात आलं. लष्करानं २९१ मजुरांना हिमस्खलन झालेल्या भागातून सुखरुप बाहेर काढलंय. त्यांना सैन्य छावणीत तातडीची मदत पुरवण्यात आलीय. अद्याप बेपत्ता असलेल्या दोन्ही छावण्यांतील मजुरांच्या शोधार्थ अद्याप शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत दोन मृतदेह लष्कराच्या हाती लागले आहेत.

अनेक ठिकाणी भूस्खलन, मदत पुरवण्यात अडथळा

घटनास्थळापर्यंत पोहचण्याच्या मार्गावर चार – पाच ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहचण्यात आणि मदत पोहचवण्यात लष्करालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. भापकुंड ते सुमना रस्त्यावर काल सांयकाळपासून ‘बॉर्डर रोड टास्क फोर्स’च्या टीम भूस्खलन झालेल्या ठिकाणचा मलबा हटवण्याच्या काम करत आहेत. या कामासाठी अजूनही सहा – ते आठ तास लागू शकतात, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आलीय.

मुख्यमंत्र्यांकडून अलर्ट जारी

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री यासंबंधी अलर्ट जारी केला. ‘नीती खोऱ्यात सुमनामध्ये हिमनदी कोसळल्याची माहिती मिळतेय. यासंबंधी मी अलर्ट जारी केला आहे. मी सतत जिल्हा प्रशासन आणि बीआरओच्या संपर्कात आहे’ असं तीर्थ सिंह रावत यांनी म्हटलं होतं.

जोरदार हिमवृष्टीमुळे बचाव दलाला मदत पुरवण्यात अडथळे येत आहेत. कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी एनटीपीसीसह इतर प्रकल्पांना रात्री काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

उल्लेखनीय म्हणजे, याअगोदर फेब्रुवारी महिन्यातही चमोली जिल्ह्यात हिमनदी फुटल्यामुळे धौलीगंगा नदीला पूर आल्यानं मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर ५४ जणांचे मृतदेह हाती लागले होते तर शेकडो जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांना प्रशासनाकडून मृत घोषित करण्यात आलं होतं.

फोटो : फोटो :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here