पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने शेवटी एफआयआर दाखल केलाच. मुंबई नागपूर घरासह दहा ठिकाणी छापे घालून तपासणी सुरू आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सीबीआय कायदेशीर कारवाई करत आहे. यातून जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई होईल,’ असं पाटील म्हणाले. यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता, ‘कुठल्याही विषयावर भाष्य करण्याची हसन मुश्रीफांना घाई असते. हायकोर्टाच्या निर्देशांनुसार होणाऱ्या सीबीआय कारवाईमध्ये भाजपचा कट कसा?’, असा प्रश्न त्यांनी केला.
वाचा:
‘आज काही सुपात आहेत, काही जात्यात आहेत. परमेश्वर सर्वांचाच हिशेब पूर्ण करतो. या जन्मी केलेले याच जन्मी भोगायचे आहे,’ असा बोचरा टोलाही त्यांनी हाणला.
‘एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझे यांनी अनिल परब आणि घोडावत यांच्यावरही आरोप केले आहेत. त्यांचीही सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली.
वाचा:
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचे टार्गेट दिले होते, असे सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. त्या संबंधीच्या व्हॉट्सअॅप चॅटचे पुरावेही त्यांनी दिले होते. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times