कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्याच्या सीमावर्ती भागातील चेकपोस्टवर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर बहिरम चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, वाहनांची तपासणी करीत असताना एका कंटेनरमध्ये कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक होत असल्याची बाब शिरजगाव कसबा पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक करून वाहनात निर्दयतेने कोंबलेल्या ६२ जनावरासह ३१ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जीवनदान दिलेल्या जनावरांना बेलोरा येथील गोरक्षण संस्थेत पाठवून चालकावर पशुसंरक्षण कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई रात्री अकराच्या सुमारास करण्यात आली. बहिरम चेकपोस्टवर नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या शिरजगाव पोलिसांच्या पथकाने दहा चाकी कंटेनरची (यूपी २१/ एएन ३५५०) तपासणी केली असता त्यात निर्दयतेने जनावरे कोंबलेली आढळली. पोलिसांनी ९ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ६२ जनावरांना जीवनदान देत २२ लाखांच्या कंटनेरसह एकूण ३१ लाख ३० हजारांचे साहित्य जप्त केले. पोलिस उपनिरीक्षक मनोज सुरवाडे यांच्या फिर्यादीवरुन कंटेनर चालक हरीमोहन उर्फ हरिश रामचंद्र चौधरी (४७) रा. कमलपूरा, कोटा (कटक), रामगंजमंडी, राजस्थान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
क्लिक करा आणि वाचा-
ही कारवाई ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मनोज सुरवाडे, यांच्या पथकाने केली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times