वाचा:
‘न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा दुरुपयोग करून सीबीआय राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा वापर राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच होत आहे,’ असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. ‘अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली. उच्च न्यायालयानं केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही,’ याकडंही जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं.
वाचा:
अँटिलिया व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या प्रकरणात केवळ प्राथमिक चौकशीची परवानगी असताना धाडी घालून सीबीआय राजकीय उद्दिष्टे साध्य करत आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
‘परमबीर सिंग यांच्या भूमिकेचे काय?’
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनीही या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. ‘कायद्यापुढे कुणीही मोठा नाही. अनिल देशमुख यांनी सुरुवातीपासून सीबीआय चौकशीला सहकार्य केले आहे. ही घटना अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या बॉम्बची आहे. त्यामध्ये आजपर्यंत सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून काम करत होता. याबाबतचा NIA ने खुलासा केलेला नाही. याशिवाय यामध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांची भूमिका काय होती? हेही स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या पत्रावरून कारवाई होतेय हे सरळसरळ राजकारण आहे,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलंय.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times