वाचा:
संजय राऊत आजच्या घडामोडींच्या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘माननीय उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा, असं सीबीआयला सांगितलं होतं. पण सीबीआयनं अनिल देशमुख यांच्या घरावर धाड टाकली. एफआयआर वगैरे दाखल केला. हा अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया… कुछ तो गडबड जरूर है,’ असा चिमटा त्यांनी काढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या कारवाईवरून भाजपला घेरलं आहे. ‘भारतीय जनता पक्ष सीबीआयचा राजकीय वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करतोय,’ असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. ‘अँटिलियासमोर बॉम्ब ठेवल्याच्या घटनेपर्यंत या प्रकरणाचा संबंध आहे. या साऱ्यामध्ये यांची काय भूमिका होती? सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून काम करत होता?, हे अद्याप उघडच झालेलं नाही. तरीही त्यांच्या पत्रावरून कारवाई होतेय हे राजकारण आहे,’ असं मलिक यांनी म्हटलंय.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचे टार्गेट दिले होते, असे सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. त्या संबंधीच्या व्हॉट्सअॅप चॅटचे पुरावेही त्यांनी दिले होते. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times