‘ब्रिटिशांनी महामारीवेळी भारतातील लोकांना मोफत लस दिली. काँग्रेसने मोफत पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम राबवला. मोदी सरकार मात्र, लसीबाबत एकाधिकारशाही निर्माण करून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. लसीचे दर वाढवून आणि टंचाई निर्माण करून नफेखोरी केली जात आहे,’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी केंद्र सरकारवर शनिवारी हल्ला चढवला. केंद्र सरकारचे नियोजन फसल्याने देशात मृत्यूचे तांडव सुरू असल्याची टीका त्यांनी केली. ( Criticises )
लसीचे असमान वाटप आणि नव्या दराविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने नाना पटोले यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना शनिवारी निवेदन दिले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोव्हिशील्ड लस केंद्र सरकारला पूर्वीप्रमाणे दीडशे रुपयात तर राज्य सरकारला चारशे व खासगी रुग्णालयांना सहाशे रुपयांत दिली जाणार आहे. ‘हम दो हमारे दो’च्या परिवारात नवीन उद्योजकांना सहभागी करून लस नफेखोरी केली जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला.
वाचा:
‘केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देते; पण देशाच्या जनतेसाठी लस नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका ओळखून केंद्र सरकारने इतर देशांप्रमाणे लसीकरण मोहीम राबवली असती तर निष्पाप नागरिकांचे जीव वाचले असते. महामारीविरोधातील नियोजनात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे,’ अशी टीका पटोले यांनी केली.
केंद्र सरकार मोठ्या भावाच्या भूमिकेत नाही
राज्य सरकार धोका ओळखण्यास कमी पडले का, या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, ‘केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मागच्या महिन्यात करोना संपला असे जाहीर केले. दुसऱ्या लाटेचा धोका केंद्र सरकारने गांभीर्याने घेतला नाही. महाराष्ट्राला दुसऱ्या लाटेचा धोका असल्याचे राज्य सरकार सतत सांगत होते. त्या दृष्टीने सरकारने वेळीच निर्बंध लागू केले; पण जगातील परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशात अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी धोरण आखायला पाहिजे होते. केंद्र सरकारने मोठ्या भावाची भूमिका बजावली नाही. राज्य सरकारला लोकांचा जीव वाचवायचा असल्याने परदेशातून लस आणण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली पाहिजे.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times